कळमेश्वर: यंत्रणा झोपली होती का! भीषण अपघातानंतर तीन तास चालक अडकला, दोन प्रशासनाकडून मदतीचा पत्ता नाही
ब्रेकिंग न्यूज | फेटरी – गोंडखैरी महामार्गावर भीषण अपघात नागपूर जिल्ह्यातील फेटरी ते गोंडखैरी महामार्गावर आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. ओव्हरलोड राकड (मुरूम) घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालकाचा ताबा सुटल्याने समोरील ट्रकला जोरदार धडक बसली.या अपघातात ट्रक क्रमांक MH 44 U 5590 ने समोरील RJ 23 GD 5245 या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रक चालक गाडीतच अडकून पडला.अपघातानंतर सुमारे तीन तास चालक गाडीत अडकून होता.