शहादा: श्रीराम कॉलनीत घरासमोरील अंगणात उभी केलेली दुचाकी चोराने लांबविली, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा शहरातील श्रीराम कॉलनीत घरासमोरील अंगणात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने २४ मार्च रोजी चोरून नेली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश राजेंद्र पटेल यांची दुचाकी (क्र. एमएच ३९ ई-२९१७) अंगणात उभी केली होती.