कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध - वरोडा ग्रामपंचायतीचा ठराव, प्रशासनाला सामूहिक निवेदन
कळमेश्वर तालुक्यात बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध - वरोडा ग्रामपंचायतीचा ठराव, प्रशासनाला सामूहिक निवेदन गिरीश आंदे कळमेश्वर तालुक्यातील मौजा वरोडा येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) मार्फत प्रस्तावित नागपूर बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतीजमिनींच्या प्रश्नावर बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत वरोडा येथे सरपंच सौ. संगीता भूपेश वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. सभेमध्ये शास