अमरावती: परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
परभणी येथील संविधान अवमान प्रकरणी झालेल्या निषेध आंदोलनात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा आणि परभणी येथील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी,अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)अमरावती जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे 17 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता निवेदनातून करण्यात आली.