सेलू: ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत राज्य महिला व कर्मचारी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा; तहसीलदारांना दिले निवेदन
Seloo, Wardha | Oct 4, 2024 उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत राज्य महिला, कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या वतीने शुक्रवारी ता. 4 ला दुपारी 12.30 वाजता बस स्थानक ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून उमेद अभियानाचे कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती हे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु, शासनाने अजून पर्यंत त्या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही.