रामटेक: राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केला रामटेक परिसरातील विविध विकासकामांचा पाहणी दौरा
Ramtek, Nagpur | Jul 5, 2026 रविवार दिनांक 5 जुलैला दुपारनंतर राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी रामटेक परिसरातील विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला. यात रामटेक येथील अंबाळा तलाव,नारायण टेकडी, नेहरू मैदान परिसरातील प्रस्तावित विकास कामांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.