रामटेक: परमात्मा एक आनंदधाम रामटेक येथे सामूहिक सुवर्ण लग्न वाढदिवस समारंभ उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Jun 2, 2026 परमात्मा एक आनंदधाम रामटेक येथे एक अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला. आनंदधाम रामटेकच्या वतीने सामूहिक सुवर्ण लग्न वाढदिवस समारंभ अत्यंत हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. दोन जूनला साय.आनंदधाम रामटेक येथे ही गोल्डन जुबली सामूहिक सालगीरा कार्यक्रम आनंदधामचे संस्थापक तसेच दोनदा महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्यासहित लग्नाला तीस वर्ष, चाळीस वर्षे तसेच लग्नाला 51 वर्षे पूर्ण झालेल्या एकूण 121 जोडप्यांचा सुवर्ण लग्न वाढदिवस थाटात झाला.