नाशिक: टोयोटा शोरूम पाथर्डी फाटा येथे सायकल चोरीतील सराईत आरोपीला अटक
Nashik, Nashik | Jan 8, 2026 विविध जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्र राज्यातून सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पाथर्डी फाटा टोयोटा शोरूम जवळून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.काही महिन्यांपासून नाशिक शहरात सायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असताना माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना अर्जुन वाणी हा चोरीची सायकल विक्री करण्यासाठी टोयोटा शोरूम येथे येणार आहे त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.