रामटेक: श्रमाचे वेतन नाही! जगायचे कसे ? देवलापार व पवनी येथील हंगामी वनमजुरांचा शासनाला सवाल..... उपोषणाचा इशारा
Ramtek, Nagpur | May 31, 2026 देवलापार (प्रादेशिक) व पवनी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रांतर्गत रोजंदारीवर काम करणाऱ्या हंगामी वनमजुरांचे मागील काही महिन्यांचे श्रमाचे वेतन न मिळाल्याने वन मजुरांनी आता उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. वारंवार मागणी करूनही मागणी डावलली जात असल्याने संतापलेल्या मजुरांनी उपोषणाचा निर्णय घेत तसे निवेदन शनिवार दिनांक 30 मे ला दुपारी अप्पर तहसीलदार देवलापार,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवलापार व संबंधित वनपरिक्षेत्र, पवनी प्रादेशिक यांना दिले आहे.