रामटेक: पवनी देवलापार क्षेत्रात चोरांचा धुमाकूळ; मोबाईल दुकान फोडले
Ramtek, Nagpur | May 26, 2026 पो. स्टे.देवलापार क्षेत्रात येणाऱ्या देवलापार पवनी क्षेत्रात मागील चार दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मागील चार दिवसात तीन मोठ्या चोऱ्या झाल्याने नागरिकात दहशत पसरली आहे. त्यामुळे चोरांनी देवलापार पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. सोमवारी दिनांक 25 च्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी पवनी येथील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लक्ष केले तर एक किराणा दुकान व रिसॉर्ट मध्ये ही चोरी केली आहे.