नागपूर शहर: चारित्र्याच्या संशयातून पतीने केली ३६ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या; असे उकलले खुनाचे गुढ : राजेश पाटील पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी तीन आक्टोंबर ला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार,चारित्र्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या ३६ वर्षीय पत्नीची बेदम मारहाण करून हत्या केल्याची थरारक घटना नागपूरमधील कपिलनगर पोलीस स्टेशन परिस घडली आहे. लक्ष्मी रोशन शहाकार असे मृत महिलेचे नाव असून, रोशन किशोर शहाकार असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी दिली आहे.