फासे पारधी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मतीन भोसले यांच्या नेतृत्वात समाजबांधवांनी आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. फासे पारधी समाज अद्यापही मुख्य प्रवाहापासून दूर असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सरकारने ठोस पावले उचलावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात इतर समाजांसाठी आर्थिक महामंडळे स्थापन करण्यात आली असताना फासे पारधी समाजासाठी अद्यापही स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही, याकडे आंद