मंठा: किर्ला–टाकळखोपा येथील अवैध वाळू वाहतुकीवर केवळ नुसता दंड नको, आता थेट जेल हवी!*
Mantha, Jalna | Apr 18, 2026 मंठा तालुक्यातील किर्ला परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई करत ता.१४ रोजी एक टेम्पो जप्त केला. मात्र या कारवाईदरम्यान काही टेम्पो व जेसीबी घटनास्थळावरून पसार झाल्याची चर्चा परिसरात रंगली असून, संबंधित वाहन मालकांना अद्याप नोटीस पाठविण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच ता.१६ रोजी टाकळखोपा–इंचा दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा आणखी एक टेम्पो महसूल पथकाने पकडला. सलग कारवाया होत असल्या तरी केवळ दंड आकारून वाहने सोडण्या