ग्रामीण महाराष्ट्राच्या, विशेषतः विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या पारंपरिक 'शंकर पट' स्पर्धेचे सावरगाव येथे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाला आमदार चरणसिंग ठाकूर, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह दिनेश टूले, प्रफुल्ल हवाले, संदीप सरोदे, उकेश चौहान आणि चंद्रशेखर काळबांडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.