रामटेक: खिंडशी समोरील मेघदूत रिसॉर्ट जवळ ट्रकच्या धडकेत 25 वर्षीय विवाहिता ठार
Ramtek, Nagpur | May 18, 2026 सोमवार दिनांक 18 मे ला दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास रामटेक - तुमसर मार्गावरील खिंडसीच्या पुढे असलेल्या मेघदूत रिसॉर्ट जवळ रामटेक येथून एका खासगी दवाखान्यातून उपचार करुन आपल्या गावी मांद्री (पंचाळा) येथे परत जात असलेल्या दुचाकी क्रमांक 40 बी यु 6030 ला मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक mp 0 9 एच जी 7572 ने धडक दिली. यात दुचाकी वर मागे बसलेली पत्नी नम्रता रोशन चौधरी वय 25 वर्ष रा. मांद्री (पंचाळा )ही रस्त्यावर पडली. तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली.