Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जळगाव पोलीस दलाचा ‘मिशन RISE’ उपक्रम : युवा नेतृत्वाच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त जळगावच्या दिशेने ठोस पाऊल �मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या "अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र" या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव पोलीस दलाने समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेणारा "मिशन RISE" हा अभिनव जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून 'युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते (Student Leaders)' तयार करण्यात येत असून, ते आपल्या महाविद्यालयात व परिसरात अमली पदार्थांविरुद्ध जनजागृतीचे नेतृत्व करतील. RISE या संकल्पनेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे – R – Resist Drugs (अमली पदार्थांना ठाम नकार) I – Inspire Others (इतरांना प्रेरणा द्या) S – Support Friends (मित्रांना योग्य वेळी मदत करा) E – Empower Drug-Free Communities (अमली पदार्थमुक्त समाज घडवा) जळगाव पोलीस दलाने या अभियानासाठी विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची निवड, त्यांचे मार्गदर्शन, जनजागृती कार्यशाळा, संवाद सत्रे, शपथविधी, रॅली, पोस्टर स्पर्धा आणि सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती अशा विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. या विद्यार्थी नेत्यांमार्फत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन व मदतीसाठी प्रेरित केले जाणार आहे. "मिशन RISE" हा उपक्रम त्याचाच एक प्रभावी भाग असून, भविष्यात प्रत्येक महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे युवा नेतृत्व निर्माण करण्याचा जळगाव पोलिसांचा संकल्प आहे. याची सुरुवात दिनांक ७ पासून एमजे कॉलेज पासून होणार आहे .. सर्व यंग लीडर ला लावण्यासाठी बॅच देण्यात येतील .. मिशन Rise च्या पोस्टर्स चे उद्घाटन आज नाशिक परिषेत्राचे आयजीपी श्री संजय येनपुरे सरांच्या हस्ते करण्यात आले . * अमली पदार्थांविरुद्धची लढाई ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन "Together for a Drug-Free Jalgaon" हे ध्येय प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन जळगाव पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.

820 views | Jalgaon, Maharashtra | Aug 6, 2026

MORE NEWS

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा ‘Mission RISE ‘X’’ उपक्रम! 🚫

📍 जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली G.H. Raisoni College of Engineering & Management, Jalgaon येथे Mission RISE ‘X’ – Drug-Free Jalgaon हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यातील युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

चला, एकत्र येऊया… व्यसनमुक्त जळगाव घडवूया! ✊🇮🇳

जळगाव जिल्हा पोलीस दलाचा ‘Mission RISE ‘X’’ उपक्रम! 🚫 📍 जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली G.H. Raisoni College of Engineering & Management, Jalgaon येथे Mission RISE ‘X’ – Drug-Free Jalgaon हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यातील युवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चला, एकत्र येऊया… व्यसनमुक्त जळगाव घडवूया! ✊🇮🇳

Jalgaon, Maharashtra | Aug 11, 2026

🚨 MISSION RISE X – DRUG-FREE JALGAON 🚨

जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘Mission RISE X – Drug-Free Jalgaon’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
💊 व्यसनाला नकार… उज्ज्वल भविष्याला होकार!
🤝 चला, मिळून घडवूया – Drug-Free Jalgaon!
जळगाव जिल्हा पोलीस दल 🚔

🚨 MISSION RISE X – DRUG-FREE JALGAON 🚨 जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय येथे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ‘Mission RISE X – Drug-Free Jalgaon’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे, व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. 💊 व्यसनाला नकार… उज्ज्वल भविष्याला होकार! 🤝 चला, मिळून घडवूया – Drug-Free Jalgaon! जळगाव जिल्हा पोलीस दल 🚔

Jalgaon, Maharashtra | Aug 10, 2026

जरांगे यांचा बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

जरांगे यांचा बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Jalgaon, Jalgaon | Aug 9, 2026

जळगाव पोलीस दलाचा ‘मिशन RISE’ उपक्रम : युवा नेतृत्वाच्या माध्यमातून अमली पदार्थमुक्त जळगावच्या दिशेने ठोस पाऊल �मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या "अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र" या आवाहनाला प्रतिसाद देत जळगाव पोलीस दलाने समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेणारा "मिशन RISE" हा अभिनव जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून 'युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते (Student Leaders)' तयार करण्यात येत असून, ते आपल्या महाविद्यालयात व परिसरात अमली पदार्थांविरुद्ध जनजागृतीचे नेतृत्व करतील. RISE या संकल्पनेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे – R – Resist Drugs (अमली पदार्थांना ठाम नकार) I – Inspire Others (इतरांना प्रेरणा द्या) S – Support Friends (मित्रांना योग्य वेळी मदत करा) E – Empower Drug-Free Communities (अमली पदार्थमुक्त समाज घडवा) जळगाव पोलीस दलाने या अभियानासाठी विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची निवड, त्यांचे मार्गदर्शन, जनजागृती कार्यशाळा, संवाद सत्रे, शपथविधी, रॅली, पोस्टर स्पर्धा आणि सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती अशा विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. या विद्यार्थी नेत्यांमार्फत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन व मदतीसाठी प्रेरित केले जाणार आहे. "मिशन RISE" हा उपक्रम त्याचाच एक प्रभावी भाग असून, भविष्यात प्रत्येक महाविद्यालयात व्यसनमुक्तीचे युवा नेतृत्व निर्माण करण्याचा जळगाव पोलिसांचा संकल्प आहे. याची सुरुवात दिनांक ७ पासून एमजे कॉलेज पासून होणार आहे .. सर्व यंग लीडर ला लावण्यासाठी बॅच देण्यात येतील .. मिशन Rise च्या पोस्टर्स चे उद्घाटन आज नाशिक परिषेत्राचे आयजीपी श्री संजय येनपुरे सरांच्या हस्ते करण्यात आले . * अमली पदार्थांविरुद्धची लढाई ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन "Together for a Drug-Free Jalgaon" हे ध्येय प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन जळगाव पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. - Jalgaon News