नाशिक: चोरीच्या 52 मोटरसायकल हस्तगत करण्यात नाशिकरोड पोलिसांना मोठे यश आले; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले कौतुक
Nashik, Nashik | Jan 9, 2026 वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत नाशिकरोड पोलिसांनी मोठी आणि विक्रमी कामगिरी करत एकाच वेळी तब्बल ५२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.तीन आरोपींकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने जप्त होणे ही नाशिक पोलीस आयुक्तालयातील आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली असून,या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष कौतुक केले आहे.