हिंगणघाट: गोविंदपुर येथे नंदिवाल्या भामटय़ांनी मुलबाळासाठी पुजा करून देण्याच्या नावावर तब्बल २३ लाख ९ हजारात घातला गंडा
गोविंदपुर येथील महेन्द्र सांबरे व त्यांची पत्नीला नंदिवाल्याने मुलबाळासाठी पुजा करून देण्याच्या नावावर तब्बल २३ लाख ९ हजारात घातला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यावर तातडीने कारवाई करून या फसवणूक करणाऱ्या भामटय़ांचा जेरबंद करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाने राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे करण्यात आली आहे.सांबरे कुटुंबियांना नंदिवाले विलास भोयर व इन्द्रपाल भोयर यांनी २३ लाख ९ हजार रुपयांवर गंडा घातला