मंठा: मठा तालुक्यात वाळू तस्करीवर मोठी कारवाई; २ टिपर जप्त
Mantha, Jalna | Apr 15, 2026 : पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू तस्करीविरोधात तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत दोन टिपर जप्त केले. तहसीलदार सुमन मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, किल्ला शिवार परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी पवारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित वाहनांचा पाठलाग करत सुमारे २ किलोमीटर पायी जाऊन पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान वाळूने भरलेले २ टिपर ताब