रामटेक: विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत रामटेक येथे 100% मतदान
Ramtek, Nagpur | Jun 18, 2026 गुरुवार दिनांक 18 जूनला तहसील कार्यालय रामटेक या मतदान केंद्रावर संपन्न विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत नगरपरिषद रामटेकच्या सर्व 23 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने रामटेक येथे शंभर टक्के मतदान पार पडल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कोळपे यांनी दिली आहे.