उत्तर सोलापूर: सोलापूरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस, ४.१० लाख रुपये जप्त;गून्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
रविवार पेठ, सोलापूर येथे ५ लाख रुपयांची घरफोडी झाल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने पदमशाली चौकात सापळा रचून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी ४,१०,००० रुपये हस्तगत केले अशी माहिती आज सायं जेलरोड येथे दिली.