Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Aap

ओमराजेंच्या निर्णयावर आमदार कैलास पाटील काय म्हणाले? प्रतिक्रिया आली समोर #OmrajeNimbalkar #KailasPatil #Dharashiv #DharashivPolitics #ShivSena #OperationTiger #PoliticalUpdate #BreakingNews #MaharashtraPolitics #MarathiNews #VeerMaharashtraNews #PoliticalNews #LatestUpdate #ViralNews #MaharashtraNews #OmrajeNimbalkar #KailasPatil #DharashivPolitics #OperationTiger #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalUpdate #BreakingNews #Dharashiv #MarathiNews #VeerMaharashtraNews #PoliticalBuzz #LatestNews #MaharashtraUpdate #viralnews

Tuljapur, Dharavshiv | Jun 18, 2026

MORE NEWS

"संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले; ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखीव" – खासदार ज्योती वाघमारे यांची बोचरी टीका

#JyotiWaghmare #SanjayRaut #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalWar #Thane #UddhavThackerayGroup #ShindeSena #BreakingNews #VeerMaharashtraNews #Maharashtra #PoliticalStatement #ViralNews #MarathiNews

"संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले; ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखीव" – खासदार ज्योती वाघमारे यांची बोचरी टीका #JyotiWaghmare #SanjayRaut #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalWar #Thane #UddhavThackerayGroup #ShindeSena #BreakingNews #VeerMaharashtraNews #Maharashtra #PoliticalStatement #ViralNews #MarathiNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 18, 2026

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा फुटलेल्या खासदारांना Y+ सुरक्षा प्रधान

'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; खासदार ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांना Y+ सुरक्षा

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असून त्यांनाही ही सुरक्षा तत्काळ लागू करण्यात आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांतराच्या चर्चांना आलेले वेग आणि काही लोकप्रतिनिधींना असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Y+ सुरक्षा श्रेणीमध्ये संबंधित व्यक्तीला 24 तास सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलन अहवालानुसार सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप निश्चित केले जाते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी आघाडीत जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत सहा खासदारांना एकाचवेळी Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

दरम्यान, सुरक्षा प्रदान करण्यामागील नेमके कारण आणि संबंधित गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या निर्णयाकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

#OperationTiger #OmrajeNimbalkar #YPlusSecurity #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #Dharashiv #PoliticalNews #MaharashtraNews #BreakingNews #veermaharashtranews

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा फुटलेल्या खासदारांना Y+ सुरक्षा प्रधान 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; खासदार ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांना Y+ सुरक्षा प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या पुण्यात असून त्यांनाही ही सुरक्षा तत्काळ लागू करण्यात आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांतराच्या चर्चांना आलेले वेग आणि काही लोकप्रतिनिधींना असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. Y+ सुरक्षा श्रेणीमध्ये संबंधित व्यक्तीला 24 तास सुरक्षा कवच उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलन अहवालानुसार सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप निश्चित केले जाते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी आघाडीत जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत सहा खासदारांना एकाचवेळी Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, सुरक्षा प्रदान करण्यामागील नेमके कारण आणि संबंधित गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या निर्णयाकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. #OperationTiger #OmrajeNimbalkar #YPlusSecurity #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #Dharashiv #PoliticalNews #MaharashtraNews #BreakingNews #veermaharashtranews

Tuljapur, Dharavshiv | Jun 18, 2026

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचा उत्साह कायम; 12 पर्यंत 53.04% मतदान

#विधानपरिषदनिवडणूक #VotingUpdate #MLCElection #Election2026 #मतदान #लोकशाही #MaharashtraPolitics #VeerMaharashtraNews #BreakingNews #ElectionUpdate

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचा उत्साह कायम; 12 पर्यंत 53.04% मतदान #विधानपरिषदनिवडणूक #VotingUpdate #MLCElection #Election2026 #मतदान #लोकशाही #MaharashtraPolitics #VeerMaharashtraNews #BreakingNews #ElectionUpdate

Tuljapur, Dharavshiv | Jun 18, 2026

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल; 18 जूनपासून सर्व भाविकांना समान ठिकाणाहून दर्शन

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करत 18 जूनपासून नवीन दर्शन पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे देणगी दर्शन आणि धर्मदर्शन रांगेतील भाविकांना आता एकाच ठिकाणाहून आणि समान अंतरावरून आई तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे.

मंदिर संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 500 रुपये देणगी दर्शन पासधारक तसेच रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना राजे शहाजी महाद्वार मार्गे प्रवेश दिला जाणार आहे. तर 200 रुपये देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरून प्रवेश मिळणार आहे. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावरून प्रवेश देण्यात येणार आहे.

नव्या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील भुयारी मार्गात सर्व रांगा एकत्र केल्या जाणार आहेत. त्यानंतर सर्व भाविकांना एकाच मार्गाने आणि समान पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे देणगी दर्शन आणि सामान्य भाविकांच्या दर्शनातील अनेक वर्षांपासूनचा फरक आता संपुष्टात येणार आहे.

मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जुन्या व्यवस्थेत देणगी दर्शन रांगेतील भाविकांमुळे धर्मदर्शन रांगेतील भाविकांना अनेकदा विलंब सहन करावा लागत होता. तसेच सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन रांग काही काळ थांबवावी लागत होती. नव्या व्यवस्थेमुळे या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून देणगी दर्शन पासधारकांना अधिक सुलभ आणि अखंड दर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वतंत्र व्यवस्था पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आली आहे. तसेच सिंहासन पूजा व अभिषेक पूजेच्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भाविकांना अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि समान दर्शन मिळावे, दर्शन प्रक्रियेत पारदर्शकता यावी तसेच गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर संस्थानने सांगितले आहे. नव्या दर्शन व्यवस्थेला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, 18 जूनपासून लागू होणाऱ्या या नव्या व्यवस्थेस सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

#तुळजाभवानी_मंदिर
#तुळजापूर
#आईतुळजाभवानी
#दर्शनव्यवस्था
#देणगीदर्शन
#धर्मदर्शन
#मंदिरप्रशासन
#भाविकांसाठी_आनंदवार्ता
#तुळजाभवानीदर्शन
#महाराष्ट्राचे_कुलदैवत
#TempleNews
#TuljabhavaniTemple
#Tuljapur
#MaharashtraNews
#VeerMaharashtraNews
#BreakingNews
#DevotionalNews
#TempleUpdate
#ViralNews
#LatestUpdates

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल; 18 जूनपासून सर्व भाविकांना समान ठिकाणाहून दर्शन प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करत 18 जूनपासून नवीन दर्शन पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे देणगी दर्शन आणि धर्मदर्शन रांगेतील भाविकांना आता एकाच ठिकाणाहून आणि समान अंतरावरून आई तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 500 रुपये देणगी दर्शन पासधारक तसेच रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना राजे शहाजी महाद्वार मार्गे प्रवेश दिला जाणार आहे. तर 200 रुपये देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरून प्रवेश मिळणार आहे. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावरून प्रवेश देण्यात येणार आहे. नव्या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील भुयारी मार्गात सर्व रांगा एकत्र केल्या जाणार आहेत. त्यानंतर सर्व भाविकांना एकाच मार्गाने आणि समान पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे देणगी दर्शन आणि सामान्य भाविकांच्या दर्शनातील अनेक वर्षांपासूनचा फरक आता संपुष्टात येणार आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जुन्या व्यवस्थेत देणगी दर्शन रांगेतील भाविकांमुळे धर्मदर्शन रांगेतील भाविकांना अनेकदा विलंब सहन करावा लागत होता. तसेच सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन रांग काही काळ थांबवावी लागत होती. नव्या व्यवस्थेमुळे या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून देणगी दर्शन पासधारकांना अधिक सुलभ आणि अखंड दर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे. मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वतंत्र व्यवस्था पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आली आहे. तसेच सिंहासन पूजा व अभिषेक पूजेच्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाविकांना अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि समान दर्शन मिळावे, दर्शन प्रक्रियेत पारदर्शकता यावी तसेच गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता यावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर संस्थानने सांगितले आहे. नव्या दर्शन व्यवस्थेला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, 18 जूनपासून लागू होणाऱ्या या नव्या व्यवस्थेस सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. #तुळजाभवानी_मंदिर #तुळजापूर #आईतुळजाभवानी #दर्शनव्यवस्था #देणगीदर्शन #धर्मदर्शन #मंदिरप्रशासन #भाविकांसाठी_आनंदवार्ता #तुळजाभवानीदर्शन #महाराष्ट्राचे_कुलदैवत #TempleNews #TuljabhavaniTemple #Tuljapur #MaharashtraNews #VeerMaharashtraNews #BreakingNews #DevotionalNews #TempleUpdate #ViralNews #LatestUpdates

Tuljapur, Dharavshiv | Jun 18, 2026

ओमराजेंच्या निर्णयावर आमदार कैलास पाटील काय म्हणाले? प्रतिक्रिया आली समोर #OmrajeNimbalkar #KailasPatil #Dharashiv #DharashivPolitics #ShivSena #OperationTiger #PoliticalUpdate #BreakingNews #MaharashtraPolitics #MarathiNews #VeerMaharashtraNews #PoliticalNews #LatestUpdate #ViralNews #MaharashtraNews #OmrajeNimbalkar #KailasPatil #DharashivPolitics #OperationTiger #ShivSena #MaharashtraPolitics #PoliticalUpdate #BreakingNews #Dharashiv #MarathiNews #VeerMaharashtraNews #PoliticalBuzz #LatestNews #MaharashtraUpdate #viralnews - Tuljapur News