रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी राखी तलाव परिसर सौंदर्यीकरण विकास कामांचा घेतला आढावा
Ramtek, Nagpur | Apr 18, 2026 शनिवार दिनांक 18 एप्रिलला सायंकाळी चार वाजता चे सुमारास राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी विकास निधीतून राखी तलाव रामटेक परिसरात सुरू असलेल्या सौंदर्यकरण विविध विकास कामांचा आढावा घेतला. राखी तलाव परिसर आकर्षक आणि सुशोभित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच लगतच्या नेहरू मैदानाचे कामही प्रगतीपथावर असून संपूर्ण परिसर विकसित करण्यावर भर दिला जात आहे.