अंबड: सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करण्याच्या वादातून मारहाण; जखमी शेतकरी उपचारासाठी रुग्णालयात, आरोपीविरुद अंबड पोलिसात तक्रा
Ambad, Jalna | Mar 5, 2026 सार्वजनिक रस्त्यावरून ये-जा करण्याच्या वादातून मारहाण; जखमी शेतकरी उपचारासाठी रुग्णालयात, आरोपीविरुद्ध पोलीसांत तक्रार 📍 अंबड (जालना) | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पांगिरवाडी येथे शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 65 वर्षीय शेतकरी भास्कर रंगनाथ गिरे यांच्यावर शेजाऱ्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर गिरे हे आपल्या पत्नी व मुलासह पांगिरवाडी येथे राहून शे