राजूरा: आ. देवराव भोंगळे यांची मौजा नागाळा येथे विदर्भाची पंढरी म्हणून परीचित तिर्थक्षेत्र वढा वारीस भेट
पवित्र देवशयनी एकादशीच्या पुर्वसंध्येला आज दि 5 जुलै ला 3 वाजता चंद्रपुर तालुक्यातील मौजा नागाळा येथे विदर्भाची पंढरी म्हणून परीचित तिर्थक्षेत्र वढा येथे निघालेल्या वारीत आ. देवराव भोंगळे सहभागी होऊन एकवटलेल्या वैष्णवांच्या मेळ्यात विठ्ठल नामाचा गजर केला. यावेळी स्वामी चैतन्य महाराज, शंकर वरारकर, मनोज देवाळकर, शंकर येमुलवार, शुभम पिंगे, विनोद नरेन्दुलवार, रवी गुरुनुले, मंगेश उलमाले, अंकित बांदूरकर, अभिषेक बोबडे यांचेसह वारकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती.