अकोट: विदयार्थिनीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याच्या प्रकरणातील आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी;अकोट सत्र न्यायालयाचा आदेश
Akot, Akola | Nov 24, 2025 येथील वि.अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप.क्र. ५४१/२०२५, कलम ७४,७५,७८,३५१ (२) भा. न्या. सं सहकलम ८,१२ पोक्सो मधील आरोपी नावेद किस्मत अली, वय २५ वर्ष रा.सावरा, याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपीची दि.०४.१२.२०२५ पर्यंत सखोल तपास करण्याकरिता अकोला जेलच्या न्यायालयीन कोठडीमधे रवानगी करण्याचा आदेश पारीत केला आहे.