नाशिक: नाशिकरोड भागातील जेहडीशिव येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने केली आत्महत्या
Nashik, Nashik | Jan 11, 2026 नाशिकरोड भागातील चेहडीशिव येथे विषारी औषध सेवन करून वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 9 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान घडली असून रात्री उशिरा नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 11 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी केलेल्या माहितीनुसार पोपट बबन गीते वय 62 राहणार नगर नाशिकरोड यांनी राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन केले.औषध उपचारासाठी घरच्यांनी त्यांना बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.