कळमेश्वर: धापेवाडा जवळ कार पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली
धापेवाडा परिसरात एक कार पलटी झाल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ सावनेरच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना घटनेची माहिती दिली.प्राप्त माहितीनुसार, MH-48-CK-1083 क्रमांकाची कार सावनेरकडून कळमेश्वरच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगत पलटी झाली.