नरखेड: १५ मेपासून आंबा आणि धान्य महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने १५ ते १८ मे या कालावधीत कुसुमताई वानखेडे स्मृती भवन येथे भव्य 'आंबा, मिलेट्स व धान्य महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध भागांतील शेतकरी, महिला बचत गट आणि स्टार्टअप्सकडून आंबा, तृणधान्ये व इतर उत्पादनांची थेट विक्री.मिलेट्सच्या (तृणधान्य) पोषक मूल्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्देश.