जालना: पर्यावरणपूरक गणेशमुर्तीचा जागतिक विक्रम; 5 हजार 348 जणांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती
Jalna, Jalna | Sep 4, 2026 एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा नवा विक्रम जालना जिल्ह्याने प्रस्थापित केला. 5 हजार 348 जणांनी एकाच ठिकाणी, एकाच वेळी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारत यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद व मान्यता मिळाल्याने जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापूर्वी बंगळुरू येथे असा उपक्रम राबविला होता.