नागपूर ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान या शोध मोहिमे अंतर्गत उमरेड सह ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक विशेष पथक स्थापन केले आहे. स्थापन केलेल्या विविध पथकाने तांत्रिक पुरावे तसेच गुप्त बातमीदार यांच्यामार्फत अल्पवयीन हरवलेल्या तसेच पळविलेला एकूण बारा अल्पवयीन बालकांचा शोध घेतला. अशाप्रकारे अल्पवयीन बालकांबाबत प्रत्येक तक्रारीचे नागपूर ग्रामीण पोलीस गंभीर दखल घेतात आणि मदतीस तत्पर आहेत.