नागपूर ग्रामीण: वडिलांच्या डोळ्यासमोर 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू, वर्धा रोडवर घडला थरारक अपघात
वर्धा रोड, डॉ. राजू देशमुख यांच्या फार्म हाऊसजवळ ही अपघाताची घटना घडली.अनिल शंकरराव मेश्राम हे त्यांच्या १७ वर्षीय मुलगी अनुष्का हिला होंडा शाईन दुचाकीवर डबलसीट घेऊन जात असताना, एका अज्ञात ट्रकचालकाने त्याचे वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अनिल आणि त्यांची मुलगी वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिहान येथील एमएस हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले