आज दिनांक 21/01/26 रोजी प्रा. आ. केंद्र कु.पिंपळगाव येथे बीनटाका स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे मॅडम यांच्या शुभ हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ. गजानन मस्के,तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. अविनाश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते. आजच्या शिबिरामध्ये एकूण 11 रुग्णांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.