गावकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी सुरू!
859 views | Nanded, Maharashtra | Sep 25, 2026 गावातील ३० वर्षे व त्यावरील नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोगाची तपासणी व वेळेत मोफत उपचार केले जाणार आहेत. "तपासणी आज... निरोगी उद्या!" हे ब्रीद घेऊन आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / आयुष्मान आरोग्य मंदिरात भेट देऊन गावकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. #स्थानिकबातम्या #आरोग्यतपासणी #माझं_गाव_आरोग्यसंपन्न_गाव #आरोग्यविभाग