नरखेड: कोंढाळी ग्रामीण रुग्णालयासाठी यंत्रसामग्री लवकरच उपलब्ध होणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
Narkhed, Nagpur | Apr 29, 2026 कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण झाली असून, आता रुग्णांच्या सेवेसाठी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचे वेध लागले आहेत. याच अनुषंगाने, रुग्णालयासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून मिळावी, या मागणीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन आमदार चरण सिंग ठाकूर यांनी निवेदन दिले.