नरखेड: भारसिंगी येथे खासदार सुप्रिया सुळे यांची पक्ष कार्यालयाला भेट; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
Narkhed, Nagpur | Jun 13, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भारसिंगी येथील कार्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सदिच्छा भेट दिली.त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते.या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.