राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या १ एप्रिलपासून टोल नाक्यांवरील रोख पैशांचे व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, आता देशभरातील सर्व टोल नाके पूर्णपणे डिजिटल पेमेंट प्रणालीवर चालणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता रोख रक्कम स्वीकारणे थांबवून शंभर टक्के डिजिटल संकलनाकडे वळणार आहे.