शहादा: शहादा शहरातील कार मार्केट मधील जीन्स कॉर्नर दुकानाच्या समोरून मोटरसायकल लंपास
शहादा शहरातील कार मार्केट मधील जीन्स कॉर्नर दुकानाच्या समोरून केतन चंद्रकांत अलकारी यांची मोटर सायकल क्र. एमएच 39 एए 0614 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत केतन चंद्रकांत अलकारी यांनी दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी शहादा पोलिसा ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना. किरण पावरा करीत आहे.