शहादा: पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात सप्तशृंगी चौकात विद्यार्थ्यांनी केली मतदानाविषयी जनजागृती
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करीत मतदान विषयी एक प्रेरक संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, प्रमुख पाहुणे ॲड.राजेश कुळकर्णी, ॲड.जगदीश कुवर, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार व पत्रकार उपस्थित होते.