नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरीता श्री रामनवमीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शहादा शहरात रुट मार्च घेण्यात आला. शहादा शहरातील रुट मार्चच्यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.