शहादा: वडाळी गावात श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा निमित्त खासदार डॉ.हिना गावित यांची उपस्थिती, गावकऱ्यांनी केले स्वागत
शहादा तालुक्यातील वडाळी या गावात श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तसेच शोभायात्रेत देखील त्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी त्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.यादरम्यान जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे व गावकरी उपस्थित होते.