आमचे नेते डॉ. परिणय फुके साहेब यांच्यावर सोशल मीडिया व जाहीर मंचावरून सातत्याने खालच्या पातळीवर टीका आणि चिखलफेक करायची, हा दुटप्पीपणा आम्ही कदापि सहन करणार नाही.
डॉ. परिणय फुके साहेबांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे आणि करत आहेत.. त्यांच्या नेतृत्वावर, कार्यपद्धतीवर किंवा लोकप्रियतेवर राजकीय टीका करायची असेल तर ती तथ्यांच्या आधारावर करा; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करणे भाजप कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत.
समन्वयाचे स्वागत; मात्र दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही!*
*भाजप–शिवसेना महायुतीच्या माध्यमातून विकासासाठी एकत्र काम करण्याच्या भूमिकेचे भाजयुमो भंडारा स्वागत करते.*
*मात्र समोर समन्वयाची भाषा आणि दुसरीकडे भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर टीका, आरोप किंवा अपमानास्पद वक्तव्ये — ही दुहेरी भूमिका स्वीकारली जाणार नाही.*
भाजपचा संयम ही कमजोरी नाही!
राजकीय मतभेद असू शकतात; मात्र वैयक्तिक टीका आणि खालच्या पातळीवरील भाषा सहन केली जाणार नाही.
श्रेयासाठी नव्हे, विकासासाठी एकत्र या.
जनतेला राजकीय संघर्ष नको, तर रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि विकास हवा आहे.
महायुती मजबूत ठेवायची असेल तर परस्पर सन्मान, युतीधर्म आणि प्रत्यक्ष समन्वय आवश्यक आहे.
आम्हाला संघर्ष नको, विकास हवा!
भाजपचा कार्यकर्ता शांत आहे, संयमी आहे; पण कमजोर नाही.
— भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्हा
— भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्हा