कळमेश्वर: वरोडा येथे पांदण रस्ता बांधकाम कार्याचा शुभारंभ
आज मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत मौजा वरोडा येथे पांदण रस्ता बांधकाम कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामासाठी ₹१० लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतापर्यंत जाण्यास सुलभता निर्माण होणार आहे. ग्रामीण विकास व शेतकरी हित लक्षात घेऊन शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना ही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.