जालना: ड्राय डे असतांनाही बेकायदा बिअर विक्री; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 14 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Aug 16, 2026 ड्राय डे असतांनाही विनापरवाना बिअर विक्री करणार्या व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 14 हजार 80 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी कोरडा दिवस असल्याने जिल्ह्यात अवैधरीत्या दारू विक्री करणार्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.