जालना: १३ वर्षीय बालकाची वेठबिगारीतून सुटका; दोषींवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..
जालना जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई
Jalna, Jalna | Aug 21, 2026 १३ वर्षीय बालकाची वेठबिगारीतून सुटका; दोषींवर कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.. जालना जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; बालमजुरी व वेठबिगारीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश.. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे पिंपळगाव परिसरात एका १३ वर्षीय पीडित बालकाची वेठबिगारी व छळातून सुटका करण्यात आली आहे. बालकाला शारीरिक व मानसिक त्रास देत जबरदस्तीने वेठबिगारीचे काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर