रामटेक: पवनी येथे ओव्हरटेक करताना मागच्या ट्रकची पुढच्या ट्रक व ट्रॅक्टरला धडक ; मोठी हानी नाही
Ramtek, Nagpur | Apr 7, 2026 मंगळवार दिनांक 07 एप्रिल ला सकाळी साडेअकरा वाजता च्या सुमारास पवनी येथे दोन ट्रक महामार्गावर नागपूर कडून जबलपुर कडे धावत असताना एपी 39 यु डी 15 66 क्रमांकाच्या ट्रक ने समोरील टी एस 36 टी 3444 क्रमांकाच्या ट्रकला धडक दिली. यात ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. यामुळे महामार्गाच्या कडेचे रोलिंग स्टॉक तुटले आणि तो अनियंत्रित ट्रक सर्विस रोड वर शिरला. शिरलेल्या या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात कुठलीही मोठी हानी झाली नाही.