कन्नड: जिल्हा विकास समितीच्या बैठकीत आमदार संजना जाधव सहभागी
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध विकासकामे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आणि निधीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा झाली. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, शेती आणिमहिला-बालकल्याण या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली