जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्येही डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी डम्पिंग ग्राउंडची अचानक पाहणी करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
#jalgaon #jalgaonlivenews