*जमिनीचे आरोग्य सुधारणे व उत्पादन वाढीसाठी नैसर्गिक शेती करा* -जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे आवाहन ** जिवाणू संघाची उपयोगिता व उपलब्धतेबाबत जनजागृती* आज जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नपदार्थांचा प्रश्न भेडसावत असताना, शेतीमालासाठी होणारा रासायनिक कीटकनाशकांचा ९५ टक्क्यांहून अधिक वापर ही एक मोठी चिंता आहे. रासायनिक निविष्ठांच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला असून मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.