परतूर: प्रल्हादपूर येथे पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी वारीमध्ये 30 हजार चिवडा पॅकेट बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Partur, Jalna | Jul 16, 2026 आज दिनांक 16 जुलै 2026वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या स्मरस परतूर तालुक्यातील प्रल्हादपूर येथे दिंडी सेवा मित्र मंडळाचा एक आगळावेगळा उपक्रम पाहायला मिळाले आहे,यावर्षी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी दिंडी सेवा मित्रमंडळाने एक उपक्रम हाती घेतला आहे, तो उपक्रम म्हणजे 30 हजार चिवडा पॅकेट बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरच हा चिवडा पंढरपूरच्या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी नेण्यात येणार आहे.